पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख-जाधव, शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
14
पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख-जाधव, शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख-जाधव, शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख-जाधव, शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांचा उमेदवारी अर्ज दाख

ल

पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख-जाधव,
पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख-जाधव,                           

पुणे

महाविकास आघाडीच्या पदवीधर मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव तसेच पुणे शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार जयंत आसगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन्ही उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उपस्थित राहून आयोजित प्रचारसभेला संबोधित केले. तरुण आणि शिक्षक वर्गाच्या अपेक्षा व प्रश्न समजून घेऊन त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रोजगाराच्या संधी, शिक्षण क्षेत्रातील अडचणी, पेपरफुटी, आर्थिक आव्हाने आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम या विषयांवर पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी सविस्तर संवाद साधणे आवश्यक असल्याचे शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.
निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचताना केवळ राजकीय भूमिका मांडण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांना समजून घेणे आणि त्यांचा आवाज पुढे नेण्याचा संकल्प महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक कार्यकर्त्याने वेळ देऊन मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ६ ऑक्टोबरला पूर्ण झाली असून, ९ ऑक्टोबरनंतर अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here