पुणे रेल्वे स्थानकावर प्रथमच डिजिटल लॉकर सुविधा सुरू
पुणे l
प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने ‘नॉन-फेअर रेव्हेन्यू’ (NFR) उपक्रमांतर्गत पुणे रेल्वे स्थानकावर प्रथमच डिजिटल लॉकर सुविधा सुरू केली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अनिल कुमार पाठक यांच्या निर्देशानुसार ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
डिजिटल लॉकरची स्थापना, संचालन व देखभाल युरोस्टील ऑफिस फर्निचर सिस्टीम्स प्रा. लि. कंपनीकडे सोपवण्यात आली असून ‘डुरोल्ट स्मार्ट लॉकर टेक्नॉलॉजी’वर आधारित ‘फॉन्झेल स्मार्ट लॉकर्स’ वापरण्यात आले आहेत. ही सुविधा पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ०१ वर, मुंबई दिशेकडे जाणाऱ्या बाजूला बहुउद्देशीय स्टॉलच्या शेजारी प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.


