पेण तालुक्यातील बांधकामाधीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची नेहा भोसले यांच्याकडून पाहणी
रायगड : रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा
पेण तालुक्यातील बांधकामाधीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची नेहा भोसले यांच्याकडून पाहणी
भोसले यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांच्यासह पेण तालुक्यातील बांधकाम सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी केली.
गुरुवारी (ता. 6) झालेल्या या दौऱ्यात प्राथमिक आरोग्य केंद्र गडब, प्राथमिक आरोग्य केंद्र कामार्ली आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पाबळ येथील सुरू असलेल्या बांधकाम कामांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेण्यात आली. आरोग्य केंद्रांची उभारणी गुणवत्तापूर्ण आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही केंद्रे महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पाहणीदरम्यान विविध विभागांचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.