जगभरात सर्वात प्रतिष्ठित मानली जाणारी मिस युनिव्हर्स स्पर्धेत यापुढे विवाहित महिला आणि मातांना सहभागी होता येणार असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. 2023 पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.याचाच अर्थ या स्पर्धेत यापुढे विवाह आणि पालकत्व यांचा स्पर्धकांच्या पात्रतेवर कोणताही परिणाम होणार नाही
2023 पासून म्हणजेच या स्पर्धेच्या 72व्या सिझनपासून हे नवीन नियम लागू होणार आहे. या स्पर्धेबाबत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे जगभरातील महिलांकडून आणि सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. दरम्यान, मिस युनिव्हर्स 2021 च्या मुकुटावर भारताच्या हरनाझ कौर संधूने आपले नाव कोरले होते. 70 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेच हरनाझ कौर संधूने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.


