आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. प्रारूप मतदार यादीत नाव आढळून न आल्यास संबंधितांनी ASDD यादीत आपले नाव तपासून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदानाच्या दिवशी होणारी गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत आपले नाव तपासावे. नावाबाबत काही त्रुटी किंवा समस्या आढळल्यास संबंधित निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करून घ्यावी.