फोंडाघाट येथील दागिने लुटण्याचा प्रयत्न करणा-या टोळीला पकडले

0
115
फोंडाघाट येथील दागिने लुटण्याचा प्रयत्न करणा-या टोळीला पकडले
फोंडाघाट येथील दागिने लुटण्याचा प्रयत्न करणा-या टोळीला पकडले

फोंडाघाट येथील दागिने लुटण्याचा प्रयत्न करणा-या टोळीला पकडले

आरोपींना भिवंडी, ठाणे परिसरातून घेतले ताब्यात

कणकवली

फोंडाघाट येथे सकाळच्या सुमारास घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या त्या टोळीला अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने भिवंडी, ठाणे, नेरूळ आदी भागांतून अटक केली. तीन आरोपींना अटक करून एलसीबी शचे पथक शनिवारी सकाळच्या सुमारास कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले.

हे पण वाचा आंब्याच्या झाडावरून कोसळल्यामुळे आचरा येथे तरुणाचा मृत्यू

जगदीश श्रीराम यादव (25, भिवंडी), चनाप्पा साईबाणा कांबळे (50, ठाणे), नागेश हनुमंत माने (41, नेरूळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघांनाही शनिवारी दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही घटना फोंडा गाडी येथे 30 नोव्हेंबरला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली होती. तृप्ती लिंग्रस व त्यांची आई या दोधी घरी होत्या तर तृप्ती यांचे भाऊ मॉर्निंग वॉकला गेले होते. याच दरम्याने वरील तीन इसम जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसले. त्यांनी तृप्ती व तिच्या आईच्या अंगावरील दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघींनीही आरडाओरड केल्यानंतर तिन्ही चोरटे आपल्या हातातील साहित्य तिथेच टाकून पसार झाले होते. याबाबत तृप्ती यांच्या फिर्यादीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.

याबाबत कणकवली व एलसीबी पोत्रीस दोघांचाही समांतर तपास सुरू होता. संशयितांचा ठावठिकाणा आढळल्यानंतर एलसीबीची टीम पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या दिशेने रवाना झाली. अखेर एलसीबीच्या पथकाने तिन्ही संशयितांना शोधून काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here