फोफेरीची चिमुकली जलपरी सारा वर्तक हिचा ऐतिहासिक पराक्रम 

0
243
फोफेरीची चिमुकली जलपरी सारा वर्तक हिचा ऐतिहासिक पराक्रम 
फोफेरीची चिमुकली जलपरी सारा वर्तक हिचा ऐतिहासिक पराक्रम 

फोफेरीची चिमुकली जलपरी सारा वर्तक हिचा ऐतिहासिक पराक्रम 

धरमतर–गेटवे ३६ किमी समुद्रप्रवास पोहून पूर्ण
अलिबाग l प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील फोफेरी गावाची केवळ ७ वर्षांची चिमुकली जलपरी सारा अभिजीत वर्तक हिने थक्क करणारा पराक्रम करत धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया असा तब्बल ३६ किलोमीटर लांबीचा समुद्रप्रवास न थांबता यशस्वीरीत्या पोहून पूर्ण केला आहे. या अविस्मरणीय कामगिरीसाठी तिने ९ तास ३२ मिनिटांचा कालावधी घेतला.विशेष म्हणजे पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी अंधारातच तिने भरसमुद्रात उतरत या धाडसी मोहिमेला सुरुवात केली.
समुद्रातील लाटा, प्रवाह आणि थकवा यांवर मात करत सारा हिने जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर हा ऐतिहासिक टप्पा गाठला. एवढ्या कमी वयात एवढा मोठा समुद्रप्रवास पूर्ण करणे ही बाब अत्यंत दुर्मिळ आणि प्रेरणादायी मानली जात आहे.सारा वर्तक हिच्या या यशाबद्दल फोफेरीसह अलिबाग तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या धैर्याला, चिकाटीला आणि पोहण्याच्या कौशल्याला सर्वत्र सलाम करण्यात येत आहे. भविष्यातही सारा अशीच नवे कीर्तीस्तंभ उभारत राहो, तिला ऑलिंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संधी मिळो आणि भारतासह फोफेरी–अलिबागचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करो, अशा शुभेच्छा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here