बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची जनतेशी भेट

0
69
बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची जनतेशी भेट
बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची जनतेशी भेट

बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची जनतेशी भेट

बारामती येथील सहयोग निवासस्थानी काल राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेतली.

या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित नागरिकांच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेतली. नागरिकांनी मांडलेल्या विषयांवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी सुनेत्रावहिनी पवार यांनी राष्ट्रवादी परिवारातील सदस्यांशी विविध राजकीय व संघटनात्मक विषयांवर चर्चा केली. पक्षकार्याचा आढावा घेत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि आगामी कामकाजासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.

या भेटीमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here