बालविवाहमुक्त रत्नागिरीसाठी प्रशासनाचा पुढाकार; नवनिर्माण हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन!

0
6

बालविवाहाचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी आणि बालकांच्या हक्कांविषयी जनजागृती; बालविवाहाची माहिती मिळताच १०९८ वर संपर्क साधण्याचे आवाहन

रत्नागिरी :
बालविवाहासारखी गंभीर सामाजिक समस्या मुळापासून दूर करून रत्नागिरी जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत २६ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथील नवनिर्माण हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बालविवाहाचे दुष्परिणाम, विवाहाचे कायदेशीर वय, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील तरतुदी आणि बालकांचे मूलभूत हक्क याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
बालविवाहमुक्त रत्नागिरीसाठी प्रशासनाचा पुढाकार; नवनिर्माण हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन!
बालविवाहमुक्त रत्नागिरीसाठी प्रशासनाचा पुढाकार; नवनिर्माण हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन!
बालविवाह ही केवळ सामाजिक अनिष्ट प्रथा नसून बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारी गंभीर समस्या आहे. बालविवाहामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होतात. तसेच त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर विपरीत परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड हेल्पलाईन १०९८ यांच्या माध्यमातून जिल्हाभर जनजागृती केली जात आहे.
नवनिर्माण हायस्कूलमधील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बालविवाह रोखण्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी, बालकांचे अधिकार आणि सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. याशिवाय चाईल्ड हेल्पलाईन १०९८ च्या कार्यपद्धतीची तसेच महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहितीही देण्यात आली.
बालविवाह रोखण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून पालक, शिक्षक, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था आणि प्रत्येक जागरूक नागरिकाची आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यासच बालविवाहमुक्त जिल्ह्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनजागृती उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here