सेनेचे माजी आमदार शंकर कांबळी याच्या निवासस्थानी तबला एक तास केसरकर व कांबळी यांच्यात चर्चा..
वेंगुर्ला प्रतिनिधी –
शिवसेनेचे वेंगुर्ले कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शंकर कांबळी व शिदे गटाचे मुख्य प्रवक्ते तथा महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर या दोघांमध्ये शंकर कांबळी याच्या निवासस्थानी तबला एक तास चर्चा झाली त्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
शिवसेना माजी आमदार व पूर्वीचे सेनेच्या बडाच्यावेळी नारायन राणे यांच्या समवेत असलेले पण त्यानंतर राणेंना फारकत घेत केसरकर याच्या समवेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केलेले माजी आमदार शंकर कांबळी यांच्यात चर्चा झाल्याने शिदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हे सेनेला जिल्ह्यात खिडार पाडत उद्धव ठाकरे यांच्या अबाधित कोकणला धक्का देण्याचे तयारीत आहेत त्यामुळे सिंधुदूर्गच्या राजकारणात जर शंकर कांबळीचा प्रवेश हा सेनेला कोकणात मोठा धक्का मानला जात आहे
शिवसेनेचा कोकण हा बालेकिल्ला मानला जातो शिंदे गट स्थापन झाल्यापासून कोकणातील दिग्गज दीपक केसरकर व उदय सामंत हे दोन कोकणचे शिवसेनेचे शिलेदार हे शिंदेघटस मिळाले त्यानंतर अलीकडे भाजप नेते व कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कात कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव त्याचबरोबर इतर आमदारांनी शिंदे गटाशी संपर्क साधला त्यामुळे कोकणातील शिवसेनेला शिंदे गट धक्का तंत्राचा वापर करणार अशी शक्यता होती
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार कॅबिनेट शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे अलीकडेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना शिवसेनेचे माजी आमदार शंकर कांबळे यांच्या शिरोडा येथील निवासस्थानी रात्र उशिरा दीपक केसरकर व शंकर कांबळे यांच्यात एक तास प्रदीर्घ चर्चा झाली यामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये खलबत्ते काय झाले हे गुलदस्तात असले तरी माझे आमदार शंकर कांबळे यांचा वेंगुर्ले व कुडाळ या दोन्ही तालुक्यांमध्ये मोठा संपर्क असून हे भंडारी समाजाचे नेते असल्याने त्यांचे सिंधुदुर्ग व रत्नागिरी मध्ये समाजात मोठे स्थान असल्याने दीपक केसरकर यांच्या राजकीय खेळेतून शंकर कांबळे शिंदे गटाच्या गळाला लागल्यास शिंदे गटाची कोकणात अधिक ताकद वाढू शकते यातून हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांना जोरदार धक्का मांडला जाऊ शकतो
अलीकडेच उद्योग मंत्री उदय सामंत हे सिंधुदुर्ग व कोकण दौऱ्यावर असताना त्यांनी शिवसेनेचे मोठे नेते आपल्या संपर्कात असल्याचा लोकप्रिय स्पोर्ट केला होता मात्र शिंदे गटाचे प्रवक्ते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे शांत स्वभावाचे राजकारण म्हणून मानले जातात मृदुभा भाषेमुळे ये संयमी राजकारणी अशी ही त्यांची ख्याती आहे त्यामुळे त्यांनी प्रसार माध्यमांशी कोणतीही व लग्न न करता शिवसेनेचे माजी आमदार व त्या वेळेचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक शंकर कांबळे यांच्याशी चर्चा करत मोठी राजकीय खेळी साधली आहे याबाबत मंत्री दीपक केसरकर व शंकर कांबळे यांचे जुने मैत्रीचे नाते असल्याने दीपक केसरकर हे शंकर कांबळे याच्या तबेतीची विचारपुस करण्यासाठी आले होते असे दोन्ही नेते सांगत असले तरी ही भेट जिल्ह्यात सेनेला धक्का देणारी आहे।
फोटो ओळी
शिदे गट प्रवक्ते व शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शिवसेना माजी आमदार शंकर कांबळी यांच्या भेटी प्रसंग


