भरणे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ चे आयोजन
खेड : तालुक्यातील भरणे येथील नवभारत हायस्कूलच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये गुरुवार, ३० एप्रिल रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे आयोजन महसूल विभागामार्फत करण्यात आले असून, ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध महसूल विषयक अडचणी तत्काळ सोडविण्याचा उद्देश आहे. या उपक्रमातून शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन प्रश्नांचे निराकरण एकाच ठिकाणी करण्यावर भर देण्यात आला आहे.
या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी Vaishali Patil यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या या उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील तालुकास्तरावर मंडळ पातळीवर अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


