भव्य भक्तिपंथ दिंडी महोत्सव २०२६ मोठ्या दिमाखात संपन्न

0
39
भव्य भक्तिपंथ दिंडी महोत्सव २०२६ मोठ्या दिमाखात संपन्न
भव्य भक्तिपंथ दिंडी महोत्सव २०२६ मोठ्या दिमाखात संपन्न

भव्य भक्तिपंथ दिंडी महोत्सव २०२६ मोठ्या दिमाखात संपन्न

सावंतवाडी l प्रतिनिधी

श्री देवी माऊली भूतनाथ मंदिर नादोडा-गोवा येथे श्री राम कला मंच पिर्ण नादोडा, स्व. सौ. वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्ट, ओल्ड गोवा व कला सांस्कृतिक संचालनालय गोवा आयोजित भव्य भक्तिपंथ दिंडी महोत्सव २०२६ मोठ्या दिमाखात पार पडला. विविध स्पर्धक दिंडी पथकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यावेळी गोवा पोलिस एस.पी. आशिष शिरोडकर व सिंधुदुर्गतील पत्रकार विनायक गांवस यांचा सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याचे उद्घाटन मुळगाव वारकरी संस्थेचे रघुनाथ गाड यांनी केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै. विठ्ठल गावस यांना श्रद्धांजली अर्पण करत स्व. कु. विठ्ठल नवसो गावस रंगमंचाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी गोवा पोलिस एस.पी. आशिष शिरोडकर व सावंतवाडी-सिंधुदुर्ग येथील पत्रकार विनायक गांवस यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी कै. वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्टच्या चेअरमन सौ. नेहा गावस, सामाजिक कार्यकर्ते ॲड. शैलेश गावस, नादोडा सरपंच सौ. विश्वजा हळदणकर, उद्योजक भावेश देसाई, प्रल्हाद गावस, प्रसाद कळगुंटकर, श्री‌ माऊली भूतनाथ पंचायतन देवस्थान समिती अध्यक्ष योगानंद गावस, खजिनदार निवृत्ती गावस, स्वागताध्यक्ष प्रमोद गावस, मंडळ अध्यक्ष आषिश गावस आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना एस.पी. श्री‌. शिरोडकर यांनी आयोजकांचे आभार मानले. तर विनायक गांवस म्हणाले, कुलदैवत श्री देवी माऊली भूतनाथच्या साक्षीन झालेला हा सन्मान विठुरायाच्या पंढरपुरातच झाल्याची भावना व्यक्त केली. तसेच उद्योजक भावेश देसाई, ॲड. शैलेश गावस, सरपंच विश्वजा हळदणकर यांनी मनोगत व्यक्त केले. गावस चॅरिटेबल ट्रस्टच्या चेअरमन नेहा गावस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गतवर्षी देखील आम्ही असाच महोत्सव आयोजित केला होता. यावर्षीही तसेच आयोजन केलं आहे. देवाच स्मरण या निमित्ताने होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या भव्य भक्तिपंथ दिंडी महोत्सवात सहभागी पथकांनी रंगत आणली. वारकरी परंपरेचा जागर यानिमित्ताने पहायला मिळाला. विठू नामाच्या गजरात नादोडा नगरी दुमदुमून गेली होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद गावस यांनी केलं. सूत्रसंचालन गोविंद भगत तर आभार वासुदेव च्यारी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here