भारतातील ‘हार्ड रॉक कॅफे’च्या सर्व शाखा बंद होणार; करार समाप्तीमुळे निर्णय

0
24

मुंबई : भारतातील लोकप्रिय ‘हार्ड रॉक कॅफे’ आणि ‘रॉक शॉप्स’च्या सर्व शाखा बंद होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हार्ड रॉक इंटरनॅशनलने JSM कॉर्पोरेशन प्रा. लि. आणि संबंधित संस्थांसोबतचा करार औपचारिकरित्या समाप्त केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

या कराराअंतर्गत भारतातील विविध शहरांमध्ये हार्ड रॉक कॅफे चालवण्याचे अधिकार JSM कॉर्पोरेशनकडे होते. करार संपुष्टात आल्याने बेंगळुरू (मुख्य शाखा), बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, व्हाईटफील्ड, चंदीगड, चेन्नई, हैदराबाद (मुख्य शाखा व हायटेक सिटी), कोलकाता, नवी दिल्ली आणि पुणे येथील शाखा बंद करण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे देशभरातील हार्ड रॉक कॅफेच्या चाहत्यांमध्ये निराशा व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून संगीत, खाद्यसंस्कृती आणि वेगळ्या अनुभवासाठी ओळखल्या जाणाऱ्या या ब्रँडच्या बंद होण्याने रेस्टॉरंट क्षेत्रातही चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, गोव्यातील ‘हार्ड रॉक हॉटेल’ सुरूच राहणार असून, त्याचा या ऑपरेटरशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here