भारतीय नौदलाच्या नव्या प्रमुखांची राज्यपालांशी सदिच्छा भेट
भारतीय नौदलाच्या नव्या प्रमुखांची राज्यपालांशी सदिच्छा भेट
भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेले नौदलाच्या पश्चिम कमांडचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांचे भारतीय नौदलाच्या प्रमुखपदी नियुक्तीबद्दल अभिनंदन केले. तसेच त्यांच्या उज्ज्वल भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या.
या भेटीदरम्यान संरक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर सौहार्दपूर्ण चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.