भारत – सायप्रस बिझनेस फोरममध्ये सहा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार; व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्राला चालना

0
37
भारत - सायप्रस बिझनेस फोरममध्ये सहा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार; व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्राला चालना
भारत - सायप्रस बिझनेस फोरममध्ये सहा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार; व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्राला चालना

भारत – सायप्रस बिझनेस फोरममध्ये सहा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार; व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्राला चालना

भारत – सायप्रस बिझनेस Forum अंतर्गत मुंबईतील Taj Mahal Palace येथे भारत आणि सायप्रस यांच्यात व्यापार, गुंतवणूक, बँकिंग, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी सहा महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या करारांमुळे भारत आणि सायप्रस यांच्यातील आर्थिक आणि औद्योगिक संबंध अधिक मजबूत होणार असल्याचे मानले जात आहे.

झालेले प्रमुख सामंजस्य करार :

⏺️ Cyprus Chamber of Commerce and Industry आणि FICCI यांच्यात उद्योग व व्यापार सहकार्याचा करार करण्यात आला.

⏺️ Invest Cyprus आणि FICCI यांच्यात गुंतवणूक प्रोत्साहनासाठी सामंजस्य करार झाला.

⏺️ Cyprus Chamber of Commerce and Industry आणि CII यांच्यात औद्योगिक सहकार्य वाढवण्याबाबत करार करण्यात आला.

⏺️ Eurobank आणि FICCI यांच्यात बँकिंग क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर सहमती झाली.

⏺️ Society of Indian Defence Manufacturers आणि Cyprus Defence and Space Industry Cluster यांच्यात संरक्षण व अवकाश उद्योग क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी करार झाला.

⏺️ Saptang Labs Pvt. Ltd. आणि Channel IT Limited यांच्यात तंत्रज्ञान क्षेत्रातील सामंजस्य करार करण्यात आला.

या करारांमुळे भारत आणि सायप्रस दरम्यान व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संरक्षण क्षेत्रातील भागीदारी अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here