मंगळवेढ्यात लोकप्रिय रील स्टार रोहिणी पराध्या यांची आत्महत्या; परिसरात हळहळ

0
136

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या २५ वर्षीय रील स्टार रोहिणी पराध्या यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी यांनी पती निलेश यांच्यासमवेत चालवत असलेल्या ‘हॉटेल ग्रामपंचायत’च्या स्वयंपाकघरात गळफास घेत आत्महत्या केली. दैनंदिन हॉटेल व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनावर आधारित रील्समुळे हे जोडपे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. त्यांच्या व्यवसायाचा अलीकडेच दोन नवीन शाखांमध्ये विस्तारही करण्यात आला होता.
प्राथमिक माहितीनुसार, वाढता कामाचा ताण, आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक वाद यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मंगळवेढा परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोशल मीडियावरही शोक व्यक्त केला जात आहे.
जर आपण किंवा आपल्या परिचयातील कोणी मानसिक तणावातून जात असेल, तर मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. संवाद आणि योग्य मदत अत्यंत महत्त्वाची असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here