मतांना लाखोंचे मोल, पण रक्षणकर्त्यांना तुटपुंजा भत्ता!

0
46
निवडणूक काळात बुथवर काम केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणारी तुटपुंजी रक्कम...
निवडणूक काळात बुथवर काम केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणारी तुटपुंजी रक्कम...

मतांना लाखोंचे मोल, पण रक्षणकर्त्यांना तुटपुंजा भत्ता!

पोलीस अंमलदार विलास मुंढेंनी नाकारला अपमानास्पद निवडणूक भत्ता

मुंबई :

निवडणूक काळात बुथवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या तुटपुंज्या निवडणूक भत्त्याचा पुन्हा एकदा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका-एका मतासाठी पाच, दहा हजार रुपये खर्च करण्याची तयारी दाखवणाऱ्या राजकीय पक्षांना आणि सरकारला, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जीव ओतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य मानधन देताना लाज का वाटत नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

सलग दोन दिवस मुक्कामी बुथवर निवडणूक कर्तव्य बजावल्यानंतर मिळणारा, आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारा आणि शिपायापेक्षाही कमी ठरणारा निवडणूक भत्ता पोलीस अंमलदार विलास मुंढे यांनी ठामपणे नाकारला. त्यांचा हा निर्णय केवळ वैयक्तिक नसून, संपूर्ण पोलीस दलाच्या स्वाभिमानाचे प्रतीक ठरत आहे.

लोकशाहीच्या रक्षणासाठी ऊन–पाऊस, दिवस–रात्र न पाहता काम करणाऱ्या पोलिसांवर आर्थिक बाबतीत अजून किती अन्याय होणार, असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. पोलीस अंमलदार विलास मुंढे यांच्या या धाडसी आणि स्वाभिमानी भूमिकेबद्दल सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here