मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा – मंत्री नितेश राणे

0
9
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा – मंत्री नितेश राणे
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा – मंत्री नितेश राणे

मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा – मंत्री नितेश राणे

मच्छीमारांना घरबसल्या घेता येणार लाभ 

मुंबई :
राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे महाडीबीटी २.० प्रणालीवर या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनांचे सुलभीकरण करण्यासाठी शासनाने Government Process Re-engineering (GPR) अंतर्गत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यामुळे लाभार्थ्यांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान सेवा उपलब्ध होणार आहेत.
या नवीन सुविधेमुळे राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक तसेच मच्छीमार संस्थांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. यापुढे विविध योजनांसाठी अनावश्यक ऑफलाइन कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. शासकीय डेटाबेसमधून आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जाणार असून, विविध प्रमाणपत्रेही ऑनलाइन स्वरूपात मिळणार आहेत.
योजनेंतर्गत मंजूर होणारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रियेतील कागदपत्रांची संख्या कमी होऊन सेवा वितरण अधिक जलद आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
सुलभ अर्ज प्रक्रिया, कमी कागदपत्रे, जलद सेवा आणि पारदर्शक कार्यपद्धती यांमुळे राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सोयीचे होणार आहे. या लाभार्थीभिमुख उपक्रमासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
ऑनलाइन अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ :
https://mahadbt2.maharashtra.gov.in/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here