मत्स्यव्यवसाय विभागाने आर्थिक काटकसर करावी – मंत्री नितेश राणे
मत्स्यव्यवसाय विभागाने आर्थिक काटकसर करावी – मंत्री नितेश राणे
मुंबई | प्रतिनिधी : राज्यातील मत्स्यव्यवसाय विभागाच्या कामकाजात आर्थिक शिस्त आणि काटकसर राखण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत. विभागातील विविध योजनांचा आढावा घेताना त्यांनी अनावश्यक खर्च टाळून निधीचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला.
मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी शासन विविध योजना राबवत असले तरी खर्च करताना पारदर्शकता आणि जबाबदारी आवश्यक असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. उपलब्ध निधीचा जास्तीत जास्त लाभ थेट मच्छीमार आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित घटकांना मिळाला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
विभागीय पातळीवरील प्रलंबित कामे, योजनांची अंमलबजावणी, अनुदान वितरण आणि प्रशासकीय खर्च यांचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. योजनांमध्ये अनावश्यक खर्च टाळून विकासकामांना प्राधान्य देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
राज्यातील मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम, आधुनिक आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत करण्यासाठी विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.