मनविसेची ‘सेल्फी विथ ज्ञानू’ मोहीम; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

0
7

मुंबई :
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मुंबईतील कीर्ती महाविद्यालय (दादर) आणि रुपारेल महाविद्यालय (माटुंगा) येथे ‘सेल्फी विथ ज्ञानू’ ही अनोखी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत दोन्ही महाविद्यालयांच्या परिसरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे कटआउट लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या कटआउटसोबत सेल्फी काढून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले.
तसेच, या पोस्टमध्ये निवडणूक आयोगाला टॅग करून आपली भूमिका मांडण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून राजीनाम्याची मागणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आणि या मागणीसाठी जनमत तयार करणे, हा या मोहिमेमागील उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून राजकीय मागण्यांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here