मनसेच्या पालघर जिल्ह्यातील वसई-विरारमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

0
12

वसई-विरार :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यातील वसई-विरार क्षेत्रातील पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि जिल्हा संघटक या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांनुसार, संदीप भगवान किणी यांची १२८ डहाणू आणि १३० पालघर विधानसभा क्षेत्रांसाठी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीधर (रवी) पाटेकर यांची नालासोपारा शहराध्यक्षपदी, विनोद मोरे यांची विरार शहराध्यक्षपदी, तर प्रवीण भोईर यांची वसई पूर्व आणि नायगाव शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रफुल्ल पाटील यांच्यावर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राच्या जिल्हा संघटकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरे यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
SEO Title: मनसेच्या वसई-विरारमधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर | Sindhudurg Samachar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here