‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींकडून कोकणाच्या समृद्ध वारशाचा उल्लेख
नवी दिल्ली, दि. १ जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, स्थानिक उत्पादने आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी कोकण आणि गोव्याची प्रसिद्ध सोलकढी, कोकम सरबत तसेच महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध हापूस आंब्याचा विशेष उल्लेख केला.



