मराठा आरक्षणासाठी आजपासून संभाजीराजेंचा एल्गार, मुंबईत आमरण उपोषण

0
103
मराठा आरक्षणा

मुबंई- खासदार संभाजीराजे छत्रपती हे आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषण करणार आहेत.

15 फेब्रुवारीला त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, आज 11.30 वाजता संभाजीराजे उपोषणस्थळी आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. त्यानंतर त्यांच्या आंदोलनाला सुरूवात होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here