मराठी भाषा विभागाची सातही संकेतस्थळे नियमितपणे कार्यान्वित

0
15
मराठी भाषा विभागाची सातही संकेतस्थळे नियमितपणे कार्यान्वित
मराठी भाषा विभागाची सातही संकेतस्थळे नियमितपणे कार्यान्वित

मराठी भाषा विभागाची सातही संकेतस्थळे नियमितपणे कार्यान्वित

मुंबई : मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेली सर्व सात संकेतस्थळे नियमितपणे कार्यान्वित असून नागरिक, विद्यार्थी, संशोधक, लेखक आणि मराठी भाषा प्रेमींना विविध ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती, साहित्य, शासकीय योजना, पुरस्कार, शब्दसंपदा, संशोधनविषयक माहिती तसेच विविध सेवा या संकेतस्थळांद्वारे उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
डिजिटल युगात मराठी भाषेशी संबंधित माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि नागरिकांना घरबसल्या सेवा मिळाव्यात, यासाठी विभागाने संकेतस्थळे अद्ययावत ठेवण्यावर भर दिला आहे. सर्व संकेतस्थळे सुरळीत सुरू असून वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here