महेश टिळेकर दिग्दर्शित आगामी “हवाहवाई” हा चित्रपट १ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मल्याळम अभिनेत्री निमिषा मराठीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “द ग्रेट इंडियन किचन” या चित्रपटातील निमिषा सजयनचा अभिनय आवडल्याने महेश टिळेकर यांनी तिला मराठीत काम करण्याविषयी विचारणा केली. त्याला निमिषाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
“हवाहवाई” या चित्रपटातील भूमिका मल्याळम अभिनेत्री निमिषाला साजेशी असल्यानं तिला मराठीत पहिला ब्रेक देण्याचं ठरवलं असं महेश टिळेकर यांनी सांगितलं.निमिषाचा बहुचर्चित ‘द ग्रेट इंडियन किचन” हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनीही आवर्जून पाहिलेला आहे.या चित्रपटात निमिषा सजयनसह मराठीतील काही प्रसिद्ध कलाकारांच्या भूमिका आहे.या चित्रपटात अनेक नवीन कलाकारांनाही संधी देण्यात आली आहे. निमिषाच्या मराठीतल्या आगमनामुळे या चित्रपटाविषयीचं कुतुहल आणखी वाढलं आहे.


