महाटीईटी/सीटीईटी माहिती भरण्यास मुदतवाढ
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ चा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल परिषदेच्या www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) अथवा सीटीईटी उत्तीर्ण झाल्याची माहिती भरण्यास २२ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी झाल्यानंतर परिषदेकडून ही अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित उमेदवारांनी https://mscepune.in/dtedola/KP2026Info.aspx या लिंकवर जाऊन आवश्यक माहिती निर्धारित मुदतीत भरावी. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी न दवडता वेळेत माहिती सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


