महाराष्ट्राचा ‘दादा’ हरपला!

0
36

महाराष्ट्राचा ‘दादा’ हरपला!

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते.अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे, आकस्मिक असं संकट महाराष्ट्रावर आले.

हाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणून कारकीर्द गाजवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा विमान अपघाताने धक्कादायक मृत्यू झाला. आज राज्याच्या राजकारणातील हा काळा दिवस असताना अजितदादांनी केलेली उल्लेखनीय कामे अधोरेखित करणे ही देखील दादांसाठी श्रद्धांजली ठरेल.

१९९१ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर, पवार हे राज्य राजकारणातील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले. गेल्या काही वर्षांत, त्यांनी अनेक प्रमुख विभाग हाताळले, विशेषतः पाणी, वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विभाग त्यांचा अभ्यास दांडगा होता. पवार यांनी राज्यमंत्री म्हणून आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हाच त्यांनी कृषी आणि ऊर्जा क्षेत्रांची जबाबदारी स्वीकारली ज्याचा फायदा यांना विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात झाला. वाढत्या वजनामुळे त्यांचा महाराष्ट्र मंत्रिमंडळात प्रवेश झाला.
नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ दरम्यान त्यांनी जल पुरवठा, ऊर्जा आणि राज्य नियोजन यांसारखी पदे सांभाळली. त्यानंतर १९९९ मध्ये पवार यांच्याकडे कृष्णा खोरे आणि कोकण प्रदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांची जबाबदारी सोपवण्यात आली. या काळात त्यांनी फलोत्पादन विभागाचीही जबाबदारी सांभाळली.
त्यानंतर त्यांनी जुलै २००४ ते नोव्हेंबर २००४ मध्ये ग्रामीण विकास, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, आणि सिंचन मंत्री म्हणून उत्तम कामगिरी केली. ग्रामीण विकासासह त्यांनी पाणी पुरवठा, स्वच्छता यावर काम केले आणि सिंचन प्रकल्पांवर आपले लक्ष केंद्रित केले.नोव्हेंबर २००४ ते नोव्हेंबर २००९ जलसंपदा आणि स्वच्छता मंत्री झाले. अजित पवार यांनी राज्यभरात जल व्यवस्थापन आणि स्वच्छता सुधारण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१० मध्ये दादांनी जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी जलसंपदा आणि ऊर्जा या दोन्ही क्षेत्रांची जबाबदारी स्वीकारली ज्यामुळे पायाभूत सुविधांच्या मुख्य क्षेत्रांमध्ये त्यांचा प्रभाव अधिक मजबूत झाला. पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सहा वेळा म्हणून सर्वाधिक वेळा होण्याचा मान व व विक्रम त्यांनी नोंदवला.
अजित पवार यांची प्रथम नेमणूक २०१० मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या राजकीय समीकरणांनुसार अनेक वेळा हे पद भूषवले. उपमुख्यमंत्री (नोव्हेंबर २०१० – सप्टेंबर २०१२) या भूमिकेत त्यांनी वित्त, नियोजन आणि ऊर्जा यांसारख्या काही सर्वात महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सांभाळली, ज्यामुळे ते निर्णय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आले व लोकप्रिय झाले. डिसेंबर २०१२ नंतर त्यांनी पुढील कार्यकाळातही त्याच पदावर काम सुरू ठेवले आणि राज्याची आर्थिक व्यवस्थापन, विकास नियोजन आणि ऊर्जा क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले.
२०१९ मध्ये सरकार स्थापनेच्या वेळी भाजपसोबत पहाटेची शपथ घेतल्यामुळे पवार चर्चेत आले असले तरी त्यांनी सरकार दोन दिवसात पडल्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा रूजू झाले हा करिष्मा त्यांचा होता. २०२३ मध्ये, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (एनसीपी) फूट पाडली आणि पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून महायुती सरकारमध्ये सामील झाले होते. मात्र या दुर्दैवी निधनानंतर एक दादांचा झंझावात रोखला गेला असला तरी दादांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे.
आदरणीय अजित पवार यांनी एक नेतृत्वाचा ठसा उमटवला असताना सहकार, शेतकी, साखर कारखाना, तसेच अर्थ व्यवस्थेसाठी मोठे काम केले. याचा उत्तम नमुना म्हणजे अर्थमंत्री म्हणून लाडकी बहीण योजना आहे. वित्तीय तूट वाढलेली असतानाही अजितदादांनी तरतूद करून ही योजना यशस्वीपणे राबवली ज्याचा फायदाही महायुतीला राज्यात सत्तेत परतून झाला. अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here