महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची गिम्हवणे शाळेला भेट; शैक्षणिक उपक्रमांची केली पाहणी

0
6
महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची गिम्हवणे शाळेला भेट; शैक्षणिक उपक्रमांची केली पाहणी
महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची गिम्हवणे शाळेला भेट; शैक्षणिक उपक्रमांची केली पाहणी

महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची गिम्हवणे शाळेला भेट; शैक्षणिक उपक्रमांची केली पाहणी

वर्गभेट, परसबाग व किचनची पाहणी; दिव्यांग विद्यार्थ्यांशी साधला आपुलकीचा संवाद

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली :
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मा. श्री. राजेश अग्रवाल यांनी दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील शाळेला भेट देऊन शाळेतील शैक्षणिक उपक्रम, भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांनी वर्गभेट घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तसेच शाळेतील परसबाग आणि किचनची पाहणी करून तेथील व्यवस्थेची माहिती जाणून घेतली.

या दौऱ्यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मा. श्री. मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी डॉ. श्री. विजय सूर्यवंशी, दापोलीच्या तहसीलदार श्रीमती अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी श्री. गणेश मंडलिक, विस्तार अधिकारी श्री. अनिल सुकाळे आणि केंद्रप्रमुख श्री. सुनील कारखेले उपस्थित होते.

मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल यांनी वर्गांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अध्ययन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. शाळेतील परसबागेची पाहणी करताना पर्यावरण संवर्धन आणि कृतीतून शिक्षण यांसारख्या उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच किचनची पाहणी करून शालेय भोजन व्यवस्थेची माहिती घेतली.

दिव्यांग विद्यार्थ्यांशी साधला संवाद
या भेटीतील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्य सचिव श्री. राजेश अग्रवाल यांनी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधल्याने भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी मिळणे आणि शाळेत सर्वसमावेशक वातावरण निर्माण होणे याचे महत्त्व या भेटीतून अधोरेखित झाले.
या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य श्री. अमोल येलवे, श्री. संजय जाधव, श्री. परशुराम कर्डे, श्रीमती श्रुती काशीकर आणि श्री. तुषार भुवड उपस्थित होते. तसेच ग्रामविकास अधिकारी श्री. उदय शिगवण यांनीही उपस्थिती दर्शविली.
शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्रीमती सुरेखा कारखेले यांनी भेटीदरम्यान शाळेतील शैक्षणिक कार्य व विविध उपक्रमांची माहिती दिली. शिक्षक श्री. मुंजाजी डुबे, श्री. सुनील राठोड, श्रीमती रुपाली भोईर, श्रीमती संजीवनी लाडे आणि श्रीमती वैशाली चांगल यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होता.
राज्याच्या सर्वोच्च प्रशासकीय पदावरील अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करणे आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणे, ही शाळेसाठी महत्त्वपूर्ण बाब ठरली. या भेटीमुळे शाळेतील शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन मिळाले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here