महाराष्ट्राच्या पशुवैभवाला राष्ट्रीय मान्यता; ‘उमरडा’ गाय आणि ‘माडग्याळ’ मेंढीला स्वतंत्र प्रजातीचा दर्जा

0
13
महाराष्ट्राच्या पशुवैभवाला राष्ट्रीय मान्यता; ‘उमरडा’ गाय
महाराष्ट्राच्या पशुवैभवाला राष्ट्रीय मान्यता; ‘उमरडा’ गाय

महाराष्ट्राच्या पशुवैभवाला राष्ट्रीय मान्यता; ‘उमरडा’ गाय आणि

‘माडग्याळ’ मेंढीला स्वतंत्र प्रजातीचा दर्जा
‘माडग्याळ’ मेंढीला स्वतंत्र प्रजातीचा दर्जा

महाराष्ट्रातील दोन वैशिष्ट्यपूर्ण पशुधन प्रजातींच्या संवर्धनाला मिळणार मोठी चालना

मुंबई :
महाराष्ट्राच्या पशुवैभवाला राष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला असून, महाराष्ट्रातील ‘उमरडा’ गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर ‘माडग्याळ’ मेंढीला स्वतंत्र अधिकृत प्रजाती म्हणून मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या स्थानिक पशुधनाची राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो (NBAGR), करनाल, हरियाणा यांच्याकडे सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरोचे संचालक डॉ. एन. एच. मोहन यांनी यासंदर्भातील अधिकृत पत्र जारी केले आहे.
७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटीच्या १४व्या बैठकीत या मान्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या पशुधनाला राष्ट्रीय स्तरावर दुहेरी सन्मान मिळाला आहे. स्थानिक पशुधनाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने ही मान्यता महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
सातत्यपूर्ण पाठपुरावा, संशोधन आणि विविध स्तरांवरील प्रयत्नांमधून महाराष्ट्राच्या पशुधनाला राष्ट्रीय मान्यता मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे.
राष्ट्रीय मान्यतेमुळे उमरडा गोवंश आणि माडग्याळ मेंढीच्या संवर्धन, जतन आणि आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांना अधिक चालना मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे स्थानिक पशुपालकांच्या उत्पन्नवाढीस मदत होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळ मिळण्याची शक्यता आहे.
पशुपालकांसाठी महत्त्वाचा निर्णय
स्थानिक पशुधनाच्या स्वतंत्र प्रजाती म्हणून झालेल्या नोंदणीमुळे या प्रजातींच्या संवर्धनासाठी शास्त्रीय पद्धतीने नियोजन करता येणार आहे. तसेच भविष्यातील संशोधन, प्रजनन कार्यक्रम आणि आनुवंशिक सुधारणा यांना राष्ट्रीय पातळीवर अधिक महत्त्व मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो, करनाल (हरियाणा) या संस्थेला पाठवलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ‘भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या’ (आयसीएआर) राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो, करनाल (हरियाणा) चे संचालक डॉ. एन.एच. मोहन यांनी याबाबतचे अधिकृत पत्र जारी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here