महाराष्ट्रातील पहिले मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रत्नागिरीत उभारणार – मंत्री उदय सामंत

0
11
महाराष्ट्रातील पहिले मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रत्नागिरीत उभारणार - मंत्री उदय सामंत
महाराष्ट्रातील पहिले मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रत्नागिरीत उभारणार - मंत्री उदय सामंत

महाराष्ट्रातील पहिले मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रत्नागिरीत उभारणार – मंत्री उदय सामंत

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि पोलीस प्रशिक्षण केंद्राची उभारणी; कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश

रत्नागिरी :
जिल्ह्यातील तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रत्नागिरीत महाराष्ट्रातील पहिले मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. यासोबतच पोलीस प्रशिक्षण केंद्रही विकसित करण्यात येणार असून, या दोन्ही प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला.
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) निधीतून साकारण्यात येणारे हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम ठरेल, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्य, अद्ययावत पायाभूत सुविधा आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देणे हा या केंद्राच्या उभारणीमागील मुख्य उद्देश आहे. आर्थिक परिस्थितीमुळे दर्जेदार मार्गदर्शनापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
या प्रकल्पाच्या अनुषंगाने कामाचे सूक्ष्म नियोजन करून ते लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश मंत्री सामंत यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण-तरुणींना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही दोन्ही केंद्रे महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्नपूर्तीसाठी स्थानिक स्तरावरच आवश्यक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here