महाराष्ट्रात अखिल भारतीय सेवांमध्ये शेकडो पदे रिक्त

0
43
महाराष्ट्रात अखिल भारतीय सेवांमध्ये शेकडो पदे रिक्त
महाराष्ट्रात अखिल भारतीय सेवांमध्ये शेकडो पदे रिक्त

महाराष्ट्रात अखिल भारतीय सेवांमध्ये शेकडो पदे रिक्त

मुंबई l प्रतिनिधी

०१ जानेवारी २०२५ रोजीच्या नागरी यादीनुसार आयएएस (IAS), आयपीएस (IPS) आणि आयएफएस (IFS) या अखिल भारतीय सेवांमधील कॅडरनिहाय रिक्त पदांची माहिती समोर आली आहे. देशपातळीवरील तसेच महाराष्ट्रातील अधिकृत संख्या आणि रिक्त पदांचा आढावा घेतल्यास प्रशासनात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याचे दिसून येते.

उपलब्ध माहितीनुसार, देशभरात आयएएसची १,३००, आयपीएसची ५०५ आणि आयएफएसची १,०२९ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्रात अधिकृत मंजूर पदसंख्या आयएएस ४३५, आयपीएस ३२९ आणि आयएफएस २०६ इतकी असून त्यापैकी अनुक्रमे ७९, २३ आणि ६७ पदे सध्या रिक्त आहेत.

या रिक्त पदांमुळे प्रशासनावर ताण वाढण्याची शक्यता असून, लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. विशेषज्ञांच्या मते, वेळेवर पदभरती न झाल्यास धोरणांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. राज्याच्या विविध विभागांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे निर्णय प्रक्रियेत विलंब होत असल्याची चर्चा आहे. विशेषतः दुर्गम व संवेदनशील भागांमध्ये प्रशासनाची परिणामकारकता राखण्यासाठी ही पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here