महाराष्ट्रात मतदार गणना अर्ज वितरण ९३.७९ टक्क्यांवर

0
4
महाराष्ट्रात मतदार गणना अर्ज वितरण ९३.७९ टक्क्यांवर; ७१.७३ दशलक्ष अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण
महाराष्ट्रात मतदार गणना अर्ज वितरण ९३.७९ टक्क्यांवर; ७१.७३ दशलक्ष अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण

महाराष्ट्रात मतदार गणना अर्ज वितरण ९३.७९ टक्क्यांवर

७१.७३ दशलक्ष अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण

मुंबई :
महाराष्ट्रातील विशेष सघन मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियानांतर्गत मतदारनिहाय गणना अर्ज (Enumeration Forms – EFs) वितरण आणि डिजिटायझेशनची प्रक्रिया वेगाने सुरू असून, ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत राज्यातील ९३.७९ टक्के अर्जांचे वितरण पूर्ण झाले आहे. तर ७२.८९ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या दैनिक बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे.
३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या अभियानात राज्यातील १,००,२५३ बूथ लेव्हल अधिकारी (BLOs) कार्यरत आहेत. राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४०९ मतदारांपैकी तब्बल ९ कोटी १७ लाख ७९ हजार ४३३ मतदारांना गणना अर्ज वितरित करण्यात आले आहेत.
तसेच आतापर्यंत ७ कोटी १३ लाख २१ हजार ९५८ अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.
कोकण विभागातील स्थिती :
  • रत्नागिरी : ९९.९८% अर्ज वितरण, ८९.८६% डिजिटायझेशन
  • सिंधुदुर्ग : ९९.९३% अर्ज वितरण, ८६.५०% डिजिटायझेशन
  • रायगड : ९८.४५% अर्ज वितरण, ७०.९०% डिजिटायझेशन
राज्यातील उल्लेखनीय कामगिरी :
हिंगोली, वर्धा, रत्नागिरी, गडचिरोली, यवतमाळ, कोल्हापूर, जळगाव, बुलढाणा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनी अर्ज वितरणात ९९ टक्क्यांहून अधिक प्रगती नोंदवली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने उर्वरित मतदारांपर्यंतही गणना अर्ज पोहोचविणे आणि प्राप्त अर्जांचे डिजिटायझेशन वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here