महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत ठाणे शहर पोलीस दलाची दमदार कामगिरी

0
41

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये Thane City Police दलातील खेळाडूंनी विविध वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत ठाणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एकूण २६ पदकांची कमाई केली. यामध्ये —

  • 🥇 ०३ सुवर्णपदके
  • 🥈 ११ रौप्यपदके
  • 🥉 १२ कांस्यपदके

अशी उल्लेखनीय कामगिरी नोंदविण्यात आली.

खेळाडूंच्या या यशामुळे ठाणे शहर पोलीस दलाचा गौरव वाढला असून, त्यांच्या मेहनत, शिस्त आणि समर्पणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ठाणे शहर पोलीस दलातील सर्व विजेते खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी स्पर्धांमध्येही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here