महाराष्ट्र १०वी परीक्षेचा निकाल ०८ मे रोजी
महाराष्ट्र १०वी परीक्षेचा निकाल ०८ मे २०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाइन जाहीर होणार.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार, ०८ मे २०२६ रोजी दुपारी ०१:०० वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, ही माहिती मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली.
सर्व विभागांचा निकाल एकाच वेळी अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होईल.
विद्यार्थी विषयनिहाय गुण पाहू शकतील आणि प्रिंटआऊट घेता येईल.
यंदाही ‘डिजी लॉकर’ ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे:
https://mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com
प्रक्रिया : आसन क्रमांक (सीट नंबर) आणि आईचे नाव (अर्जाप्रमाणे) टाकून ‘निकाल पहा’ वर क्लिक करा.
शाळांना ‘स्कूल लॉगिन’ वर एकत्रित निकाल मिळेल.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘श्रेणी / गुणसुधार योजना’अंतर्गत पुढील तीन संधी उपलब्ध. अनुत्तीर्ण किंवा फेरपरीक्षा देणाऱ्यांसाठी जून-जुलै २०२६ मध्ये पुरवणी परीक्षा होईल. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया स्वतंत्र परिपत्रकाने कळवली जाईल.


