महिलांच्या सुरक्षिततेसाठी व आधारासाठी १८१ हेल्पलाईन सेवा
महिलांना संकटाच्या काळात तातडीची मदत आणि आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी १८१ महिला हेल्पलाईन सेवा कार्यरत करण्यात आली आहे.
या हेल्पलाईनच्या माध्यमातून संकटग्रस्त महिलांना त्वरित मदत, समुपदेशन, कायदेशीर मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती तसेच विविध शासकीय यंत्रणांमार्फत आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
घरगुती हिंसाचार, छळ, मानसिक त्रास, अत्याचार, सामाजिक समस्या किंवा इतर कोणत्याही अडचणींचा सामना करणाऱ्या महिलांसाठी ही सेवा महत्त्वपूर्ण आधार ठरत आहे. महिलांच्या सुरक्षितता, सन्मान आणि सक्षमीकरणासाठी १८१ हेल्पलाईन प्रभावीपणे कार्यरत आहे.
गरज भासल्यास महिलांनी निःसंकोचपणे १८१ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


