महेश चंद्र त्रिपाठी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या ५०व्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली
महेश चंद्र त्रिपाठी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या ५०व्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली
लोकभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी समारंभ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची उपस्थिती
मुंबई :
मुंबई उच्च न्यायालयाचे ५०वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून मा. श्री. महेश चंद्र त्रिपाठी यांनी पदाची शपथ घेतली. लोकभवन, मुंबई येथील दरबार हॉलमध्ये त्यांच्या शपथविधीचा समारंभ पार पडला. या समारंभास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या.
मुख्य न्यायमूर्तीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वीकारल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी महेश चंद्र त्रिपाठी यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
न्याय, निष्पक्षता आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करत न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर न्यायव्यवस्थेच्या कार्याला त्यांच्या अनुभवाची आणि मार्गदर्शनाची निश्चितच दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.