माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा शिवसेना (शिंदे गटात) जाहिर प्रवेश.
प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
“आताच्या काळात संघटना चालवणं कठीण आहे, हे आम्हाला कळून चुकलं होतं. त्यामुळे आता शिवसेनेत प्रवेश करत आहोत, याचा आनंद आहे. आमचा शिवसेनेतील जन्म आहे, शिवसेनेतच आता शेवट व्हावा”, अशी इच्छा बच्चू कडून व्यक्त केली आहे.
“बच्चू कडूंनी सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं आहे तसेच दिव्यांगांसाठी झटणारा हा नेता आहे” असं एकनाथ शिंदे पक्षप्रवेशावेळी म्हणाले.


