माजी सैनिकाच्या मुलाला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाखांची आर्थिक मदत

0
8
माजी सैनिकाच्या मुलाला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाखांची आर्थिक मदत
माजी सैनिकाच्या मुलाला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाखांची आर्थिक मदत

माजी सैनिकाच्या मुलाला परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी एक लाखांची आर्थिक मदत

रशियातील केमेरोव्हो स्टेट युनिव्हर्सिटीत स्वप्नील सावंत याचे एमबीबीएसचे शिक्षण; सैनिक कल्याण विभागाकडून मदतीचा धनादेश प्रदान

सिंधुदुर्ग :
माजी सैनिकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या कल्याणकारी निधी योजनेअंतर्गत परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला एक लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील सबनीसवाडा येथील माजी सैनिक संतोष मेघश्याम सावंत यांचे पाल्य स्वप्नील सावंत हा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये रशियातील केमेरोव्हो स्टेट युनिव्हर्सिटी (Kemerovo State University), केमेरोव्हो येथे एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. त्याच्या वैद्यकीय शिक्षणासाठी सैनिक कल्याण विभागाच्या कल्याणकारी निधी योजनेतून मंजूर झालेल्या एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते माजी सैनिक संतोष सावंत यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रभारी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण कोळी तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
सैनिक कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक तसेच त्यांचे अनाथ पाल्य आणि अवलंबित यांच्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून शैक्षणिक मदत, स्वयंरोजगार आणि पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी सैनिक कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ०२३६२-२२८८२० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here