माणगाव येथील दत्तमंदिरात मोठया भक्तीभावात श्री दत्त जयंती उत्सवाला प्रारंभ
कुडाळ | प्रतिनिधी
माणगाव येथे प. पू. टेंब्ये स्वामींनी स्थापलेले प्रसिद्ध श्री दत्त मंदिर येथे आजपासून दत्त जयंती उत्सवाला मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली आहे.
हे पण वाचा मांगवलीतील तरुणावर बिबट्याचा हल्ला तरुण गंभीर जखमी
आज पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कोल्हापूर, रत्नागिरी याठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. मंदिरात आज पहाटे अभिषेक, महापूजा, आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त जयंतीनिमित्त मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे.
भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन तसेच स्थानिक स्वयंसेवकांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पोलिस प्रशासनही सतर्क आहे. दत्त जयंती उत्सवानिमित्त परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून श्री गुरुदत्त दिगंबर या जयघोषाने सर्वत्र नाद घुमू लागला आहे.