मानपाडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ४३ गहाळ मोबाईल शोधून मालकांना परत
ठाणे शहरातील मानपाडा पोलिस Manpada Police Station यांनी तांत्रिक विश्लेषण आणि आधुनिक तपास पद्धतींच्या सहाय्याने उल्लेखनीय कामगिरी करत ४३ गहाळ मोबाईल फोन शोधून काढले आहेत.
शोधण्यात आलेल्या मोबाईल फोनची एकूण किंमत सुमारे ₹९.८७ लाख इतकी असून हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले.
तांत्रिक विश्लेषण, डिजिटल ट्रॅकिंग आणि प्रभावी तपासाच्या माध्यमातून मानपाडा पोलिसांनी अल्पावधीत ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली. या कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून ठाणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.