मालदीव कॅरम विश्वचषकात प्रशांत मोरे तिसऱ्यांदा विश्वविजेता!
माले (मालदीव) | प्रतिनिधी
मालदीव येथील कॅरम असोसिएशन (CAM) यांच्या वतीने ०२ ते ०६ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित ७ व्या कॅरम विश्वचषक स्पर्धेत भारताने नेत्रदीपक कामगिरी करत सर्वच स्पर्धांमध्ये वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेत प्रशांत मोरे (भारत) यांनी पुरुष गटात सुवर्णपदक जिंकत तिसऱ्यांदा विश्वचषक विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत भारताने एकूण ७ सुवर्ण, ४ रौप्य आणि ३ कांस्य पदके जिंकत ऐतिहासिक यश संपादन केले. या विजयी कामगिरीबद्दल महाराष्ट्र कॅरम असोसिएशन (MCA) यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
पुरुष एकेरी निकाल
प्रथम – प्रशांत मोरे (भारत) – सुवर्ण
द्वितीय – श्रीनिवास कोमरावेल्ली (भारत) – रौप्य
तृतीय – अभिजित त्रिपांकर (भारत) – कांस्य
महिला एकेरी निकाल
प्रथम – कीर्थना लोगनाथन (भारत) – सुवर्ण
द्वितीय – काजल कुमारी (भारत) – रौप्य
तृतीय – खाझिमा महबूब माशा (भारत) – कांस्य
स्विस लीग निकाल
प्रथम – अब्दुल आसिफ (भारत) – सुवर्ण
द्वितीय – हाफिजुर रहमान (बांगलादेश) – रौप्य
तृतीय – के. श्रीनिवास (भारत) – कांस्य
या वर्षीच्या विश्वचषकात १७ देशांतील १५० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला, त्यामुळे माले शहरात आंतरराष्ट्रीय क्रीडा वातावरण अनुभवायला मिळाले. भारतीय खेळाडूंनी या संधीचे सोने करत देशाचा तिरंगा जागतिक व्यासपीठावर उंचावला.


