मालमत्ता कराची सर्व माहिती आता थेट मोबाईलवर

0
17
मालमत्ता कराची सर्व माहिती आता थेट मोबाईलवर
मालमत्ता कराची सर्व माहिती आता थेट मोबाईलवर

मालमत्ता कराची सर्व माहिती आता थेट मोबाईलवर

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) प्रशासनाने नागरिकांसाठी मालमत्ता कर व्यवस्थापन अधिक सुलभ आणि डिजिटल करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता मालमत्ता करासंदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती, नोटिसा, देयकांची आठवण, कर भरण्याचे अपडेट्स आणि इतर सूचना थेट नागरिकांच्या मोबाईलवर SMS किंवा WhatsApp द्वारे उपलब्ध होणार आहेत.
यासाठी नागरिकांनी आपला मोबाईल क्रमांक मालमत्ता क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर घरबसल्या मालमत्ता कराची अद्ययावत माहिती मिळणार असून महापालिकेच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही.
महापालिकेने नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर मोबाईल क्रमांक नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here