माळेगाव नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांना गती देण्याच्या सूचना; प्रलंबित कामांचा आढावा

0
10

बारामती :
बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक उप मुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी घेतली. यावेळी नगरपंचायत क्षेत्रातील सुरू असलेल्या तसेच प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
माळेगाव नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांना गती देण्याच्या सूचना; प्रलंबित कामांचा आढावा -सुनेत्रा  अजित पवार
माळेगाव नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांना गती देण्याच्या सूचना; प्रलंबित कामांचा आढावा -सुनेत्रा अजित पवार
बैठकीत विविध कामांची सद्यस्थिती, अडचणी आणि आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित विकासकामांसाठी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करून कामांना गती देण्याच्या सूचना उपस्थित सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या.
नागरिकांच्या अपेक्षा आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. तसेच बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रत्येक मुद्द्यावर झालेली कार्यवाही आणि कामाच्या प्रगतीचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
माळेगाव नगरपंचायत क्षेत्राचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी विकासकामांचा सातत्याने आढावा घेऊन प्रभावी पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here