मिरकरवाडीतील महिला मत्स्य व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या – उद्योगमंत्री उदय सामंत

0
20
मिरकरवाडीतील महिला मत्स्य व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या - उद्योगमंत्री उदय सामंत
मिरकरवाडीतील महिला मत्स्य व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या - उद्योगमंत्री उदय सामंत

मिरकरवाडीतील महिला मत्स्य व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या – उद्योगमंत्री उदय सामंत

कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

रत्नागिरी :
मिरकरवाडी येथे महिला मत्स्य व्यावसायिकांसाठी उभारण्यात येत असलेल्या दुकानांच्या कामाची रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी महिला मत्स्य व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांच्या दैनंदिन व्यवसायातील अडचणी, आवश्यक सुविधा, गरजा आणि अपेक्षा जाणून घेतल्या.

महिला मत्स्य व्यावसायिकांना व्यवसायासाठी सुरक्षित, स्वच्छ, सुसज्ज आणि सोयीस्कर वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी सुरू असलेल्या कामाचा सामंत यांनी सविस्तर आढावा घेतला.
दुकानांच्या कामामध्ये आवश्यक त्या सुधारणा करून बांधकामाचा दर्जा उत्तम राखावा तसेच काम वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या. महिला व्यावसायिकांना व्यवसाय करताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक सुविधांचा समावेश करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.
मिरकरवाडा हे रत्नागिरीतील प्रमुख मासळी उतरविण्याच्या केंद्रांपैकी एक असून, येथे मत्स्य व्यवसायाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here