मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घेतले आई मुंबादेवीचे दर्शन

0
6
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घेतले आई मुंबादेवीचे दर्शन
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घेतले आई मुंबादेवीचे दर्शन

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घेतले आई मुंबादेवीचे दर्शन

शारदीय नवरात्रीनिमित्त आशीर्वाद घेत मुंबईकरांच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना

मुंबई : शारदीय नवरात्रीच्या मंगलमय पर्वानिमित्त मुंबईची आराध्य देवता असलेल्या आई मुंबादेवीच्या चरणी मुंबईच्या महापौर रितू तावडे नतमस्तक झाल्या. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सी आणि डी प्रभाग समितीचे अध्यक्ष आकाश पुरोहित यांच्यासह त्यांनी देवीचे दर्शन घेतले.
भक्ती, श्रद्धा आणि चैतन्याने भारलेल्या या पवित्र वातावरणात आई मुंबादेवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केल्याने मन प्रसन्न झाल्याची भावना महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केली.
आई मुंबादेवीचा आशीर्वाद समस्त मुंबईकरांवर सदैव राहो, प्रत्येक कुटुंबात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी नांदो, तसेच मुंबईवर आईची कृपादृष्टी कायम राहो, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
आई मुंबादेवीचा उदो उदो!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here