मुंबईत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस निपुण’ दाखल

0
12
मुंबईत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस निपुण’ दाखल
मुंबईत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस निपुण’ दाखल

मुंबईत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस निपुण’ दाखल

पाण्याखालील बचाव व डायव्हिंग क्षमता होणार मजबूत

मुंबई, ३१ ऑगस्ट :
भारतीय नौदलाने स्वदेशी बनावटीचे आणि बांधणीचे दुसरे डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (DSV) ‘आयएनएस निपुण’ आज, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईत नौदलाच्या सेवेत दाखल केले. या जहाजाच्या समावेशामुळे नौदलाची विशेष डायव्हिंग, पाण्याखालील हस्तक्षेप, बचावकार्य आणि पाणबुडी बचाव सहाय्य क्षमता अधिक बळकट झाली आहे.
नौदल प्रमुख CNS ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली आयएनएस निपुणचा सेवेत समावेश करण्याचा सोहळा पार पडला. यावेळी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (FOC-in-C) व्हाईस ॲडमिरल संजय वत्सयन उपस्थित होते.
या सोहळ्यास वरिष्ठ नौदल अधिकारी, हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडचे (HSL) प्रतिनिधी, माजी सैनिक, मान्यवर पाहुणे तसेच जहाजाच्या कार्यारंभाशी संबंधित कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
आयएनएस निपुण हे स्वदेशी तंत्रज्ञान आणि जहाजबांधणी क्षमतेचे प्रतीक मानले जात असून, पाण्याखालील विविध मोहिमा आणि विशेष डायव्हिंग ऑपरेशन्समध्ये हे जहाज महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पाणबुडी बचाव सहाय्य, समुद्रातील बचावकार्य आणि पाण्याखालील हस्तक्षेपासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
बांधकामाधीन जहाजापासून आता भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झालेल्या जहाजापर्यंतचा प्रवास पूर्ण करत आयएनएस निपुण भारताच्या सागरी हितांचे संरक्षण करण्यासाठी सज्ज झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here