मुंबईत २५ नोव्हेंबरला ‘स्वराज्याचा सागरध्वज’ भव्य सांस्कृतिक सोहळा

0
6
मुंबईत २५ नोव्हेंबरला ‘स्वराज्याचा सागरध्वज’ भव्य सांस्कृतिक सोहळा
मुंबईत २५ नोव्हेंबरला ‘स्वराज्याचा सागरध्वज’ भव्य सांस्कृतिक सोहळा

मुंबईत २५ नोव्हेंबरला ‘स्वराज्याचा सागरध्वज’ भव्य सांस्कृतिक सोहळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती, आमदार प्रमोद जठार संकल्पनाकार

मुंबई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाचा, स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा आणि मराठी संस्कृतीच्या वैभवाचा जागर घडविणारा ‘स्वराज्याचा सागरध्वज’ हा भव्य सांस्कृतिक सोहळा बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असून, आमदार प्रमोद जठार हे या सोहळ्याचे संकल्पनाकार आहेत.
मुंबईत २५ नोव्हेंबरला ‘स्वराज्याचा सागरध्वज’ भव्य सांस्कृतिक सोहळा
मुंबईत २५ नोव्हेंबरला ‘स्वराज्याचा सागरध्वज’ भव्य सांस्कृतिक सोहळा
सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणी दिनानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना या सांस्कृतिक सोहळ्यातून मानवंदना अर्पण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सादरीकरणाच्या माध्यमातून शिवकालीन इतिहासाचा भव्य आविष्कार अनुभवायला मिळणार आहे. संहितालेखन, संगीत, गायन, ध्वनी संयोजन, प्रकाशयोजना आणि ग्राफिक्स यांच्या सुरेख मिलाफातून स्वराज्याच्या इतिहासाचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी अंबर हडप यांनी संहितालेखन केले असून, मंदार खर्डे निवेदनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. कमलेश भडककर यांचे संगीत संयोजन हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असेल. तसेच केतकी भावे जोशी, स्वरा जोशी, नचिकेत देसाई, जितेंद्र तुपे, विद्या करलगिकर आणि नरेंद्र उमप हे गायक आपल्या सादरीकरणातून कार्यक्रमात रंगत आणणार आहेत.
आमदार प्रमोद जठार हे कार्यक्रमाचे संकल्पनाकार असून, सुहास आदिकरकर संयोजक म्हणून काम पाहत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांच्याकडे निमंत्रक म्हणून जबाबदारी आहे.
या सोहळ्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे स्मरण, मराठी संस्कृतीचा अभिमान आणि सामाजिक बांधिलकी यांचा त्रिवेणी संगम या कार्यक्रमातून साधला जाणार आहे.
बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात हा भव्य सोहळा रंगणार आहे. नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here