मुंबई उच्च न्यायालयाची नवी वेबसाईट सुरू
१ एप्रिलपासून जुनी साइट बंद
मुंबई : Bombay High Courtने आपल्या अधिकृत संकेतस्थळात महत्त्वाचा बदल जाहीर केला असून १ एप्रिल २०२६ पासून जुनी वेबसाईट बंद करून नवी वेबसाइट सुरू करण्यात आली आहे.
आतापर्यंत वापरात असलेली https://bombayhighcourt.nic.in ही जुनी वेबसाइट बंद करण्यात येणार असून, आता https://bombayhighcourt.gov.in ही नवी अधिकृत साइट कार्यरत होणार आहे.
नव्या संकेतस्थळावर अधिक आधुनिक, सुलभ आणि वापरकर्त्यास अनुकूल सेवा देण्यावर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या नवीन वेबसाइटवर ‘मुंबई उच्च न्यायालय’ असा मराठीतही उल्लेख करण्यात आला आहे.
या बदलामुळे नागरिक, वकील आणि न्यायालयीन कामकाजाशी संबंधित सर्व घटकांना अधिक सोयीस्कर आणि जलद सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


