मुंबई उपनगरातील विकासकामांना गती द्या – पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

0
13
मुंबई उपनगरातील विकासकामांना गती द्या - पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश
मुंबई उपनगरातील विकासकामांना गती द्या - पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई उपनगरातील विकासकामांना गती द्या – पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी) अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा तसेच जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ मधील अर्थसंकल्पीय तरतुदींचा आढावा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री Ashish Shelar यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांची सद्यस्थिती, प्रगती तसेच निधीच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री शेलार यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्व विकासकामांना गती देऊन ती निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या.
मंजूर विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात यावी. तसेच विकासकामांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करून प्रकल्पांना गती देण्यावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
विकासकामांसाठी उपलब्ध निधीचा प्रभावी आणि नियोजनबद्ध वापर करण्यासोबतच त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहोचेल, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंजूर कामे प्रलंबित राहणार नाहीत आणि निधीचा विनियोग वेळेत होईल, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस मुंबई उपनगर जिल्हाधिकारी Saurabh Katiyar यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here