मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रकला भीषण आग; शहापूरच्या चेरपोली येथील घटना

0
2

शहापूर :
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरमधील चेरपोली येथे मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात कापडाचे तुकडे आणि कपड्यांचे अवशेष भरलेले होते. या ज्वलनशील मालामुळे आगीची तीव्रता वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
महामार्गावरील या घटनेमुळे वाहतुकीवर परिणाम झाला का, तसेच आगीचे नेमके कारण काय होते, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here